MIDC recruitment 2023 : MIDC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

MIDC recruitment 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

नोकरीचे ठिकाण (Place)

महाराष्ट्र

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) – ८०२ जागा

पात्रता (Qualification)

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता स्थापत्य गट – अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
सहयोगी रचनाकार गट – अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.
उप रचनाकार गट – अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब – स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब – यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक रचनाकार गट- ब – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब – मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.
लेखा अधिकारी गट – ब – मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
क्षेत्र व्यवस्थापक गट-ब – कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क – मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क – मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क – मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क – मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुटंकलेखक गट – क – मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
सहाय्यक गट – क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
लिपिक टंकलेखक गट – क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लेखापाल गट- क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क – शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क – शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.
पंपचालक (श्रेणी-२) गट – क – पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
जोडारी (श्रेणी-२) गट- क – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
सहाय्यक आरेखक गट- क – महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.
अनुरेखक गट- क – शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
गाळणी निरिक्षक गट- क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.
भूमापक गट – क – शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ – मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.
सहायक अग्निशमन अधिकारी गट – क – बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
कनिष्ठ संचार अधिकारी गट -क – बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क – माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
चालक यंत्र चालक गट-क – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अग्निशमन विमोचक गट- क – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).

वयोमर्यादा (Age Limit)

१८ ते ४० वर्षे सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

पदानुसार – १९९००/- ते ६७७००/- + इतर भत्ते

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.१,०००/- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/-

Last Date to Apply (शेवटची तारीख)

२५ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important