Maharashtra Archeology Recruitment 2023 : Maharashtra Archeology Department invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Maharashtra Archeology Recruitment 2023

पयर्टन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

पयर्टन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन

नोकरीचे ठिकाण (Place)

महाराष्ट्र शासन

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क). – ३९ जागा, (१ वर्षांसाठी).

पात्रता (Qualification)

सहाय्यक अधिक्षक (गट-क) – कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
कनिष्ठ अभियंता (गट-क) – शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता.
जतन सहायक (गट-क) – शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
तंत्र सहायक (गट-क) – प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता किंवा प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी.
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) – माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण.
उप आवेक्षक (गट-क) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Building Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण.
छायाचित्रचालक (गट-क) – माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) – ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान व्दितीय वर्गातील पदवी धारण केली आहे.
फार्शीज्ञात संकलक (गट- क) – ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) – ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.
संशोधन सहाय्यक (गट- क) – ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
संकलक (गट-क) – ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) – ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे. ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.
अभिलेख परिचर (गट-क) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) – अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) – अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.
टिप्पणी सहायक (गट-क) – पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

१८ ते ४० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट,

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

राज्य सरकारी नियमानुसार

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – १००० रुपये, मागासवर्गीयांसाठी ९०० रुपये.

Last Date to Apply (शेवटची तारीख)

५ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important