ITBP bharti 2022 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स ने हेड कॉन्स्टेबल गट क अराजपत्रित पदांच्या 248 जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. खाली आपल्याला या जॉब संबंधी माहिती मिळेल. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०२२ आहे.

या वेबपेज वर पदाचे नाव, रिक्त जागा, अर्ज मोड, अर्ज फी, पात्रता इत्यादी आवश्यक माहिती आपल्याला खाली दिली आहे. या दिलेल्या माहितीमुळे आपल्याला विनासायास अर्ज करता येऊ शकेल. ऑनलाइन अर्ज लिंक चालू झाल्यावर ITBP भरतीसाठी अर्ज करण्यास सुरवात करावी. केंद्र सरकारच्या नोकऱ्या शोधणारे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)
पदांचे नाव: हेड कॉन्स्टेबल गट क पदे
रिक्त पदांची संख्या: २४८ पदे
नोकरी प्रकार : पोलीस नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट : www.itbppolice.nic.in

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

हेड कॉन्स्टेबल (प्रत्यक्ष) पुरुष १३५
हेड कॉन्स्टेबल (प्रत्यक्ष) महिला २३
हेड कॉन्स्टेबल (LDCE) ९०
एकूण २४८

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 12वी पास असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे.
कमाल वय: 25 वर्षे. थेट साठी
कमाल वय: 35 वर्षे. LDCE साठी

निवड प्रक्रिया:

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),
शारीरिक मानक चाचणी (PST),
लेखी परीक्षा,
कौशल्य चाचणी,

पगार :

किमान पगार: रु.२५,५००/-
कमाल पगार: रु.८१,०००/-

अर्ज फी:
सामान्य/ओबीसी (पुरुष उमेदवार) – रु. १००/-
SC/ST/महिला – कोणतेही शुल्क नाही

अर्ज कसा करावा?

१. खाली दिलेली जाहिरात डाउनलोड करा
२. पात्रता तपशील वाचा, पात्र असल्यास अर्ज करा
३. खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
४. आवश्यक ती माहिती भर
५. अर्ज सबमिट करा आणि संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा

Important